बाग काम आणि निसर्ग
बाग काम आणि पर्यावरण:
बाग कामाचा माझा छंद फार जुना मात्र त्यात अतिशय खोलगट अभ्यास आणि अनुभव घेताना पर्यावरण जपून घेतलेले अँक्शन भविष्यात आपल्या मुलांना काय देऊन जाऊ? हा खोलगट विचार केल्यास असे लक्षात आले की मनुष्य जाती असो वा प्राणी (वनस्पती वर जगणारे) सध्या आपल्या गरजा फक्त अन्न, वस्त्र आणि निवारा हेच मूळ ध्येय असावे.
वाढती महागाई, पर्यावरणात झालेले मानवी बदल, वाढते शहरी करणं आणि त्याचा निसर्गावर होणारा परिणाम हे तर सर्वांना ठाऊकच आहे ह्यात काही मी नवीन जोडत नाही.
एक म्हण आहे
पेराल नाही तर उगवेलच कसे?
पण म्हणी पेक्षा अधिक अनुभव मोठ्ठा असे माझे ठाम मत आहे.
आणि ह्या म्हणी मध्ये थोडे बदल करावे से वाटते..
ते म्हणजे काय पेराल ? हे महत्वाचे.
आपल्या पृथ्वी तळावर खारट पाणी फक्त ३ च टक्के.
त्यात भारतीय (हिंदुस्तान, इंडिया लोकसंख्या )140.76 crores (2021)
आणि जागतिक लोक संख्या 788.84 crores (2021).
पाण्याचा कर भरतो म्हणजे काही फारसा उपकार करत नाही निसर्गावर तर कुणाच्या पोटाची सोय होत असते. पण महत्वाचा मुद्दा म्हणजे मी निसर्ग विकत घेतले नाही इकडे भाडेकरू आहे त्या मुळे जितके हवे तितके पाणी वापरून पुढच्या पिढीस काही तरी ठेवेन हे वागणुकीतून बदलणे योग्य वाटते.
कोणती ही गोष्ट अती केली की झाली माती:
देव देतो आणि मी घेतच राहतो..हे जर आपले वागणे राहिले तर वरील म्हण खोटी वाटत नाही.
आई कडून प्रेम मिळाले म्हणून इतरांना आणि निसर्गाला प्रेम देण्यात सुख मिळते.
वडिलांकडून व्यावहारिक कर्तृत्वाचा धडा मिळाला म्हणून इतराबाबत आणि निसर्गा बाबत व्यावहारिक वागावे..म्हणजे त्यास हानी न देता कृतीतून व्यवस्थित वागण्याचे प्रयत्न करावेत.
सासू बाईंनी शिकवले वीज वापर कशी करावी.
मुलानी आधुनिक विज्ञान आणि त्याचे निष्कर्ष काढून सांगितलेल्या गोष्टी पटण्या सारख्या आहेत की विज्ञान फक्त फॅक्ट (वस्तू स्थिती) सांगते.
मी मुळात होते कंत्राट शिक्षिका आणि आता माझा व्यवसाय जरी रोपांचा असला तरी भर गच्च कमवण्या पेक्षा पुढच्यास काय आनंद होईल निसर्ग जपून व काय उपयुक्त ठरेल हा मुद्दा महत्वाचा वाटतो.
ऑक्सीजन देणाऱ्या वनस्पती:
बाग काम करता करता पूर्ण जगातील सुंदर दिसणारे आकर्षित करणारे सर्व तंत्र, वस्तू व सोयी ह्याचा लोभ मला पण येत असे, आणि वाटेल तसे जे मिळेल ते लावण्यास सुरुवात केली, मात्र जेव्हा प्रत्यक्षात अनुभव आले की अश्या वनस्पती ज्यांचे विज्ञान ऑक्सीजन असल्याचे सांगते अगदी टेबल, खुर्च्या, खिडक्या, गच्ची भर भरून लावत गेले मग त्यास रोज पाणी घालण्याची ड्युटी लागली आणि कधी चुकून राहिले तर सुकलेल्या झाडांना पाहून येणारा मनस्ताप हा वेगळाच असे.
त्यात असे पण लक्षात आले की इतके ऑक्झिजन चे थोतांड मांडत गेलो तरी वारा हा स्वतः एक तत्व आहे तो तर झाडांना उपयुक्त ठरतो आणि पण ऑनलाइन किंव्हा फुकट ला भरपूर काही बघून सर्व काही मिळवण्याचा प्रयत्न जरी केला तरी हा विचार संपत नाही की वाळवंटात वनस्पती कमी असते मग तिकडे लोक कसे बरे जगत असावेत? म्हणजे आपण कुठे पाणी खर्च करतो ते पहा...!
करोना श्राप की वरदान?
ह्या जागतिक आरोग्य आपत्ती च्या काळात सर्वांनी आप आपले बागेचे छंद अजून खुलून जगले मी ही तेच केले.
पण एक वेळ अशी आली की ह्या रोगाची लागण झाल्यास आर्थिक स्थिती खाळवल्या मुळे वैद्यकीय उपचार न करता मरणे पत्करले पण औषध घ्यायचे नाही असे ठरवले. आणि काय तर स्वतः हुन बरी देखील झाले विश्वास आणि इच्छा शक्ती द्वारे मग काय ? तिसऱ्या लाटेला २ वर्ष ओलांडले पण एकही गोळी अथवा इंजेक्शनची गरज पडली नाही.
म्हणून औषधी वनस्पती गोळा करण्या पेक्षा बरे होण्या साठी वरील दोन कारणे योग्य वाटू लागली.
वेळेची गरज आणि भविष्य:
सध्या प्राणी आणि पक्षी ह्यांना फळ, धान्य, वनस्पती आणि भाज्या ह्याची गरज आहे तर तेच लावणे ठरवले ज्या मुळे पाण्याची नासाडी होणार नाही.
कपड्यांचे आकर्षण कुणाला वाटणार नाही? मात्र जमिनीत कपडे कुजण्यास १५-२० वर्ष लागतात त्याचे काय?
ही पोस्ट वाचून लोकांना प्रश्न येईल की अहो भर भरून पानी पडते..तर माझे उत्तर असे की समुद्रात वाढ होण्याची कारणे शोधावीत.
चांगली फुले अगदी टोपली भरून कुणाला आवडत नाहीत? मला पण आवडतात.
पण सध्या त्यांचे ही आकर्षण संपत आले आहे कारण देवाला किती ही वाहिली तरी तो तृप्त होत नाही आणि मी देखील किती ही त्यांच्या कडे बघून खुश होऊ पण त्या मधील मोह आणि वासा ची वासना मला निसर्गा चा विचार महत्वाचा म्हणून ह्या बाबतीत तरी मागे ठेवते.
आपले प्रश्न यावेत अशी माझी इच्छा
विद्या क्रियेशन
प्रियांका भागचंदानी (मीनू चौधरी)