बाग काम आणि निसर्ग
बाग काम आणि पर्यावरण: बाग कामाचा माझा छंद फार जुना मात्र त्यात अतिशय खोलगट अभ्यास आणि अनुभव घेताना पर्यावरण जपून घेतलेले अँक्शन भविष्यात आपल्या मुलांना काय देऊन जाऊ? हा खोलगट विचार केल्यास असे लक्षात आले की मनुष्य जाती असो वा प्राणी (वनस्पती वर जगणारे) सध्या आपल्या गरजा फक्त अन्न, वस्त्र आणि निवारा हेच मूळ ध्येय असावे. वाढती महागाई, पर्यावरणात झालेले मानवी बदल, वाढते शहरी करणं आणि त्याचा निसर्गावर होणारा परिणाम हे तर सर्वांना ठाऊकच आहे ह्यात काही मी नवीन जोडत नाही. एक म्हण आहे पेराल नाही तर उगवेलच कसे? पण म्हणी पेक्षा अधिक अनुभव मोठ्ठा असे माझे ठाम मत आहे. आणि ह्या म्हणी मध्ये थोडे बदल करावे से वाटते.. ते म्हणजे काय पेराल ? हे महत्वाचे. आपल्या पृथ्वी तळावर खारट पाणी फक्त ३ च टक्के. त्यात भारतीय (हिंदुस्तान, इंडिया लोकसंख्या )140.76 crores (2021) आणि जागतिक लोक संख्या 788.84 crores (2021). पाण्याचा कर भरतो म्हणजे काही फारसा उपकार करत नाही निसर्गावर तर कुणाच्या पोटाची सोय होत असते. पण महत्वाचा मुद्दा म्हणजे मी निसर्ग विकत घेतले नाही इकडे भाडेकरू आहे त्या मुळे जितके हवे तितके पाणी वापरून ...